सर्व कागदपत्र घेऊन दुपारी मुंबईच्या जर्मन दुतावासात मी हजर झाले. याआधीचा तिथला अनुभव गाठीशी असल्यामुळे तिथल्या सुरक्षारक्षकांनी कितीही सांगितले की अजून वेळ व्हायची आहे, दूर उभे राहा, तरीही दाराजवळच उभे राहायचे, तरच लवकर आत जाता येईल हे माहित होते. अखेर १ वाजला आणि मी आत गेले. ५ वाच नंबर मिळाला. तसा लवकरच होता म्हणजे. सगळे कागदपत्र पुन्हा एकत्र करून, त्यांनी सांगितलेल्या क्रमाने लावून मी आत माझ्या नंबरची वाट बघत होते. अखेर मला बोलावले गेले. नवरा जर्मनीत असल्याकारणाने माझ्या dependant visa साठी अर्ज करण्याची ही पहिली पायरी होती. खिडकीच्या आतून एका मुलीने सगळी कागदपत्रे एकेक करून आत घ्यायला सुरुवात केली. नाव, गाव, पत्ता या मुख्य काही प्रश्नानंतर अधिक खोलात चौकशी सुरु झाली. A1 ही जर्मन भाषेची प्राथमिक परीक्षा देणे या visa साठी आवश्यक आहे. त्याचे प्रमाणपत्र सोबत होते. ते पाहून तिने काही जर्मन मध्ये बोलता येईल का असे विचारले. हो असे म्हणून मी माझी प्रमुख माहिती जर्मन मध्ये बोलून दाखवली. जे काही आधी वाचले होते आणि ऐकले होते, त्याप्रमाणे मी लग्नाची पत्रिका सोबत ठेवली होती. तीसुद्धा देशपांडे आणि शेंबेकर दोन्ही कडची. पण तिने पत्रिका नको म्हणून परत दिली गेली. फोटो चा एक मोठा अल्बम सोबत होताच. पण त्याशिवाय एक छोटा सुद्धा होता. कारण मोठ्या अल्बम मधील फोटो हे वेगळे काढता येण्यासारखे नव्हते. तिने फोटो मागितले तेव्हा मी विचारले की मोठा दाखवू का? त्यावर ती नको म्हणाली आणि छोट्या अल्बम मधले २ फोटो काढून उरलेले मला परत दिले. यादरम्यान तिच्या एका सहकारी मैत्रिणीशी मधेच काहीतरी कुजबुजली. Marriage Certificate ची जर्मन भाषांतरित प्रत देखील मला परत दिली. आणि आता बाई म्हणाली, की तुमच्या केस मध्ये verification करावे लागेल. तुम्हाला इमेल येईल. त्याप्रमाणे पैसे भरले की पुढचे काम होईल. हे ऐकूनच पायाखालची अर्धी जमीन सरकली. वेबसाईट वर याविषयी माहिती दिलेली होती. परंतु 'काही केसेस मधेच' म्हणजे आपले बहुतेक करून होणार नाही किंवा होऊ नये ही मनात असलेली आशा इथे सपशेल लोप पावली. बाहेर येउन सुमेधला फोन केला आणि हे सांगितले. माझा आवाज पूर्णच खोल गेला होता. आपल्याच बाबतीत का यावर उत्तर नव्हते. तरीही सुमेध पुन्हा आशा ठेवून होता की कदाचित मी चुकीचे ऐकले असेल किंवा कदाचित होऊ शकेल असं ती म्हणाली असेल. आणि पुढचे १५ दिवस असे सरले. आणि मग इमेल आला की १३००० रुपये एवढी रक्कम जमा करा. ज्या काही आशा होत्या त्या सर्व विरल्या आणि १३००० रपये भरण्यासाठी २ च दिवसात मी परत मुंबईला गेले. यावेळी दुसऱ्या शाखेत जायचे होते. तिथे सकाळी ९ ते १२ या वेळेत मी फक्त बसले होते. बाबांना आत सोडले नाही. त्यामुळे त्यांना बाहेरच थांबावे लागले. अखेर ३ तासांनी एक जर्मन माणूस आला, माझा पासपोर्ट आणि पैसे घेऊन आत गेला. १० मिनिटांनी मला पासपोर्ट आणि पैसे भरल्याची पावती देऊन परत गेला. या १० मिनिटांच्या कामासाठी मी ३ तास आत आणि बाबा बाहेर ताटकळत होते. आत आल्यावर फोन करायचा नाही त्यामुळे बाबांशी sms वरून बोलणे चालू होते. हे झाल्यानंतर मी माझा पुण्यातील गाशा गुंडाळून बुलढाण्याला गेले. आता पुढे काय होतंय ह्याची वाट बघणे एवढेच फक्त हातात होते.
वेबसाईट वर दिलेल्या माहितीप्रमाणे भारतीय लग्नाचे प्रमाणपत्र हे बरेचदा खोटे बनवले जाते असा समज असल्या कारणाने ते वेगळे पडताळून बघू शकतात. पण मग आमचेच का हा मोठा प्रश्न डोके खात होता. १२ आठवडे इतका कालावधी या पडताळणी साठी लागू शकतो असे नमूद केलेले होते. परंतु एवढे होउन देखील आपले लवकर होईल ही आशा मनाने सोडली नव्हती. ३ आठवडे उलटून गेले तरीही काहीच उत्तर मिळत नव्हते.२७ मार्च ला अर्ज भरला. १६ एप्रिल ला पडताळणीचे पैसे भरले. २ आठवडे बुलढाण्याला राहून मी नाशिक ला आले. कदाचित ते लोक नाशिक ला येतील असे वाटत होते. आमच्या नाशिक च्या सगळ्या शेजार्यांना, अगदी गल्लीतल्या धोब्याला सुद्धा सांगून ठेवले होते की कुणी आले आणि विचारले तर सांगा म्हणून. महिनाभर नाशिक ला येउन सुद्धा पडताळणी साठी कुणी घरी आले नव्हते. फोन केला तर In Process हे उत्तर आणि तेही उद्धटपणे मिळत होते. अखेर कंटाळा येउन मी परत बुलढाण्याला परतले. यादरम्यान हजारो लोकांचे प्रश्न सुरु होते. सगळेच जण आस्थेने चौकशी करत होते. माझ्या व्हिसा साठी प्रार्थना कारणाने होते. पण त्या वेळी मला सगळं नकोसं झालेलं होतं. कुणाशी बोलावसं वाटत नव्हतं. येईल येईल म्हणून कुणी कितीही समजावले तरीही त्या क्षणी पुन्हा आशा करण्याची हिम्मत होत नव्हती. त्यात मग सगळ्यांचे पडताळणी का हे प्रश्न. नेमके समजावून सांगणे पण कठीण होते. आमच्या Marriage Certificate मधेच खरंच काही चूक आहे का असेही मग लोकांना वाटत होते. मनातले तर्क वितर्क जोरात सुरु होते. आपण रजिस्टर लग्न करायला हवे होते का? काही वेळा वाटायचं की पासपोर्ट वर नाव अजून बदलले नाही म्हणून झालं असेल का? लग्नाची नोंदणी आम्ही ग्रामपंचायती मध्ये केली होती कारण आमचं घर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. म्हणून हे झाले असेल का असंही वाटत होतं. बुलढाणा फारच लहान गाव आहे, पुण्यात केलं असतं तर वगैरे वगैरे. जर तर मालिका संपत नव्हती. यापैकी कदाचित कोणतेच कारण खरे नव्हते पण त्यावेळी अशी अवस्था होती की नेमके काहीच सुचत नव्हते.
१२वी नंतर होस्टेल ला राहायला आल्यापासून इंजिनीअरिंग ची चार वर्षे आणि पुढे नोकरी यामुळे ही पहिलीच वेळ होती मनसोक्त माहेरी राहण्याची. पण या प्रश्नांमुळे ना मी त्याचा आनंद घेऊ शकत होते, ना आई बाबा. त्यांना आपली मुलगी सोबत आहे याचा आनंद होता पण बिचारे ते सुद्धा आता वाट बघून मला समजावण्याचा प्रयत्न करत होते. कितीतरी गोष्टी रिकामपण मिळालं की करू असे ठरवले होते. पण आता रिकामपण असून काही करण्याची इच्छा होत नव्हती. थोडीफार पुस्तके वाचून झाली. सगळ्या फालतू अगदी सासू सून टाइप मालिका सुद्धा मी बघायला लागले होते. अगदी पाठ झाल्या होत्या सगळ्या मालिका. मागचे एक वर्ष टी. व्ही. नसल्याचे मला कधी जाणवले नव्हते. आणि या दिवसांत मी वेड्यासारखी T V बघत होते. रोज रात्री सुमेध शी स्काइप वर बोलायचं आणि मग निवांत सकाळी उठायचं हे एखाद्या आळशी मुलीप्रमाणे माझं रुटीन सुरु होतं. आणि ५ जून ला सकाळी ९:४५ ला मी गाढ झोपेत असताना बाबांनी उठवून सांगितलं की जर्मन दूतावासाचे लोक आले आहेत. पुढच्या ५ मिनिटात मी दात घासून पुढच्या खोलीत हजर होते. तोवर आईने त्यांना चहा पाणी विचारायच्याही आधी लग्नाचा मोठा अल्बम त्यांच्या पुढे नेउन ठेवला होता. आई बाबा दोघेही असतील नसतील तेवढी उरलेली सगळी कागदपत्रे शोधण्यात गुंग झाले होते. चहा घेता घेता पुढचे थोडेफार बोलणे सुरु झाले. हा जर्मन दुतावासाचाच एक उत्तर प्रदेशीय माणूस होता. माझ्या महान हिंदीतून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरु होता. आता मोठ्ठा प्रश्न सारखा मनात येत होता की, हा माणूस इथे पोचला कसा?कारण माझा पासपोर्ट पुण्याच्या पत्त्यावर आहे. अर्जात देखील त्यावेळी मी पुण्यात नोकरी करत असल्याने पुण्याचा पत्ता होता. सुमेध चा पासपोर्ट नाशिक च्या पत्त्यावर आहे. बुलढाण्याच्या घराचा पत्ता कुठेच नव्हता. केवळ नोंदणी बुलढाणा, तेही सुंदरखेड ग्रामपंचायत (बुलढाण्याच्या लगतच हे खेडं आहे जे कधीच बुलढाण्यात सामावलंय. पण ग्रामपंचायतीच्या हद्दीत) या एकमेव पत्त्यावर तो आधी बुलढाणा आणि अनुक्रमे सुंदरखेड ला पोचला. ग्रामपंचायत सकाळी ८ वाजता बंद असल्याने जवळपास कुणी देशपांडे राहतात का असे विचारीत होता. आता त्यात देशपांडे. पायलीला पन्नास सापडतात. १-२ लोकांना माहित नव्हते. एक आमच्या ओळखीचे काका भेटले. त्यांनी हे सर्व माझ्याविषयी असू शकते हे ताडून त्याला आमचे घर दाखवले आणि तो आमच्या घरी पोचला. हे चहा घेताना कळले. बापरे, एवढे सगळे उपद्व्याप करून कुणी इथे येईल असं काही डोक्यात पण आलं नव्हतं.
चहा कसाबसा घेऊन पुढच्या ५ मिनिटात मी अंघोळ करून तयार होते. सुमेध शी २ मिनिटेच फोन झाला. तेवढ्या वेळातही अश्रू गाळून झाले. तो ऑफिसला जायचा गडबडीत होता. त्याला तिकडे राहून काही सुचत नव्हते. त्यावेळी पुढे नेमके काय घडणार आहे हे देखील माहित नव्हते. त्यामुळे त्याची अवस्था अजूनच वाईट होती.
आता लग्नाच्या सीबीआय चौकशीला सुरुवात झाली. आईने त्याला दहादा ऐकवले की आम्ही कधीची वाट बघतोय. सगळे लग्नाशी संबधित कागदपत्र आईबाबा त्याला दाखवत होते. लग्नाच्या खरेदी दरम्यान च्या सगळ्या पावत्या सुदैवाने आई बाबांकडे होत्या. दोघांच्याही अति व्यवस्थित पणामुळे त्या सगळा एक फाईल मध्ये एकत्र लावलेल्या होत्या. त्याने न मागताही आईने त्याला त्या दिल्या. आता तो म्हणाला आपल्याला ग्रामपंचायतीत जावे लागेल कारण प्रमाणपत्र तेथील आहे. त्यानंतर जिथे लग्न झाले त्या कार्यालयात. आणि मग अजून काही ठिकाणी. आधीच अडीच महिन्यानंतर तो उगवला होता. त्यामुळे या क्षणी तो म्हणेल ते सगळे करायला आम्ही तयार होतो.
मी, तो आणि बाबा असे गाडीने पहिल्या स्थानाकडे निघालो. ग्रामपंचायत. तिथे जाऊन त्याला मुख्य प्रत बघायची होती. नेमका ग्रामपंचायतीचा कारभार. आधी एकतर असे कुणीतरी जर्मन दूतावासामधून आले आहे, का आले आहे हे समजावून सांगणे महाकठीण. पण शेवटी छोट्या गावात हे तोटे असले तरीही आपले बल्लुभाऊ (´बाबांचं टोपणनाव) आलेत, त्यांच्या मुलीचं काम आहे हे पाहिल्यावर सगळे लोक ती प्रत शोधण्यात गुंतले. आणि नशीबाने २ फाइली धुंडाळून झाल्याबरोबर प्रत सापडली. आता त्याला एक कुठलातरी नंबर हवा होता. आता तो नंबर शोधायचा म्हणजे आधी तो त्या ग्रामपंचायतीच्या माणसाला माहीती असायला हवा, माझ्या हृदयाचे ठोके वाढलेलेच होते, सापडावं की नाही याला. परंतु नशीब माझं. जमलं त्याला हवा तो नंबर शोधायला. एकूण एक शब्द या माणसाने तपासून पाहिला. मग म्हणाला की यात ज्यांची साक्षीदार म्हणून नावे आहेत, त्यांना भेटायचंय. आता त्याला अजून एका कागदावर सरपंचाची सही हवी होती. आणि सरपंच महाशय दुसरया गावातल्या कार्यालयात गेले होते. जरा रक्तदाब ठिकाणावर यायला लागला की पुन्हा वाढायचाच. मग त्या सरपंचाच्या भ्रमण ध्वनी वर सुद्धा संपर्क होत नव्हता. आणि हा माणूस अडूनच बसला. तो म्हणाला मी उद्या पर्यंत थांबायला सुद्धा तयार आहे. झाले, हे काम उद्यावर जायला नको नाहीतर मग अजून उशीर होईल. पण अडला हरी. तेवढ्यात सरपंचाचा फोन लागला. तो म्हणाला मी घरूनच देईन शिक्के मारून. पण दुपार होईल बुलढाण्यात पोचायला. त्यावर तो तयार झाला. मग आमची गाडी पुढे निघाली.
आता आम्ही गेलो कार्यालयात. कार्यालयातील पावती सुद्धा लगेच मिळाली. परंतु या महाशयांना त्या कार्यालय मालकाचे एक पत्र हवे होते. ते नेमके कार्यालयात नव्हते. पण जवळच त्यांचे दुकान आहे आणि तिकडे या असे फोनवर म्हणाले. त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी पत्र दिले की हे लग्न माझ्याच कार्यालयात झाले. परंतु त्यांचे वेगळे प्रश्न सुरु होते. माझ्या भाची साठी आणि अजून कुणासाठी अमेरिकेच्या व्हिसाला हे असे काही लागले नाही. मग तुम्हालाच का हवंय. मग त्यांना हे समजावून सांगितले की हे जर्मनी च्या व्हिसा साठी आहे. अमेरिकेसाठी नाही. शिवाय त्यांचा प्रश्न हा होता की माझ्याकडे कार्यालय बुकिंग साठी देशपांडे आले होते. शेंबेकर नाही. त्यामुळे मला फक्त हेच माहिती आणि दुसरे म्हणजे यांचा जावई काय करतो, जर्मनीत राहतो की अमेरिकेत याच्याशी खरंतर माझा काहीच संबंध नाही. हे त्यांचे म्हणणे अगदीच बरोबर होते. पण अखेर त्यांनी मधुरा ह. मु/ बुलढाणा आणि सुमेध ह. मु. जर्मनी मूळ गाव नाशिक यांचे लग्न माझ्या कार्यालयात या या दिवशी लागले असे प्रमाणपत्र दिले.
हे झाल्यानंतर पुढे मग प्रमाण पत्रावरील इतर साक्षीदारांचे पत्र हवे होते. सुदैवाने हे दोघेही वकील होते. कोर्टात जाऊन त्यांना भेटलो आणि वकील भेटल्यामुळे या दूतावासातील माणसाचा विश्वास बसला. त्या दोघांनीही नोटरी प्रमाणपत्रच करून दिले. हे काम सहज आटोपले. आता प्रमाणपत्रावरील पुढची सही होती गुरुजींची. आमच्या लग्नात एक महिला पुजारी होत्या. त्यांच्या घरी गेलो तर त्या पुण्याला गेल्या होत्या आणि १५ दिवस तरी परत येणार नव्हत्या. पुन्हा काय करायचे हा प्रश्न पडला. पण आतापर्यंतच्या अनुभवावरून त्याचा जर विश्वास बसला होता. तो म्हणाला की यांच्या नवऱ्याचे पत्र सुद्धा चालेल फक्त त्यासोबत ओळखपत्राची एक प्रत द्या. पुढचे एक काम पूर्ण झाले. आता आम्ही घरी आलो. जेवण केले. मग घरातल्या सगळ्यांचे पत्रलेखन आणि प्रश्नोत्तरे. आई बाबा दोघांकडून लिहून घेतले की माझा जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झाले, लग्न प्रेमविवाह होता, आम्ही कसे भेटलो, लग्न आई बाबांच्या संमतीने झाले आणि आता आमच्या मुलीला जर्मनी ला जायचे आहे. हे सगळं पुन्हा माझ्याकडून. मग आमचे ३ शेजारी. त्यांच्याकडून आम्ही कसे आहोत, विशेष करून मी कशी आहे, आणि ते लोक सुद्धा माझ्या लग्नाला हजार होते अशी पत्र आणि प्रत्येकाचे ओळखपत्राची प्रत. पुन्हा सखोल चौकशी झाली की हा स्वजातीय विवाह आहे ना? वगैरे वगैरे. अजून सरपंच भाऊ भेटायचे होते. ते घरी आल्यावर त्यांचाच फोन आला. मग बाबा त्याच्याकडून हव्या त्या सह्या घेऊन आले. शिवाय त्याला फोटो हवे होते लग्नातले. मी सांगितले की मी दोन तीन फोटो दिलेत interview च्या वेळी. ते चालणार नाहीत म्हणे. आणि त्यातही पुन्हा वो सिंदूर भरते समय, वो पंडित जी भी दिखने चाहिये, वो फेरे वाला चाहिये असे सगळे सुरु होते. आता नेमका तो सिंदूर वाला फोटो काही दिसेना. शेवटी व्हीडीओ कट करून फोटो द्यावा लागतोय की काय असे वाटले. परंतु इतर ५ फोटो हो नाही करत त्याने accept केले. आणि संध्याकाळी हे महान नाट्य संपले. आता काही काळजी करू नका, पंधरा दिवसात मी जर्मनीला पोचलेली असेन असे आश्वासन देऊन तो गेला. लगेच तत्काळ आरक्षण काढून मी परत नाशिक ला पोचले. पंधरा दिवसांचे परत २५ दिवस झाले तरीही व्हिसाचा पत्ता नव्हता. फोन केला तरी पुन्हा १२ आठवडे अजून झाले नाहीत, आम्ही अजून काहीच सांगू शकत नाही हेच उत्तर मिळत होते.
या सगळ्याचा अशक्य कंटाळा येउन सुमेध ने एक आठवडा सुट्टी घेतली आणि त्याने भारतात यायचे ठरले. त्याच वेळी तिकडून काही होऊ शकतेय का म्हणून तो मानहाइम मधील परप्रांतीयांचे जे ऑफिस असते तिथे जाऊन भेटला. त्यावर त्यांनी सांगितले की अजून आमच्याकडे मुंबईतून कागदपत्र आलेले नाहीत. तोवर आम्ही काहीच करू शकत नाही. अखेर माझा १२ आठवडे हा verification चे पैसे भरल्यानंतरचा लिखित कलवधी संपला त्याच दिवशी मी परत दुतावासात फोन केला आणि या वेळी सर्वप्रथम १२ आठवडे होऊन गेलेत आणि verification होऊन देखील १ महिना झालाय हे सांगितले. आज पहिल्यांदाच पलीकडून आवाज जर नरमलेला वाटला. ठीक आहे बघतो असे म्हणून त्याने परत दोन दिवसांनी फोन करायला सांगितले. दोन दिवसांनी सुमेध जेव्हा जर्मनीतील ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्यांनी सांगितले की हो, कागदपत्र मिळालेत परंतु तुम्ही अजून probation मध्ये आहात. ते संपेपर्यंत आम्ही पुढे काही करू शकत नाही. हात तोंडाशी आलेला घास काढून घेतल्यासारखे पुन्हा आम्ही त्या विषण्ण मनस्थितीत गेलो. थोडेफार प्रयत्न केल्यानंतर त्या लोकांनी सांगितले की तुम्ही थोडे लवकर probation संपेल असे काही पत्र आणले तर चालेल. त्यासोबत इतर काही जर्मन भाषांतरीत पत्र हवी होती. यापैकी बहुतेक सगळी मी पहिल्या दिवशी दिली होती तेव्हा मला परत देण्यात आली होती. पण सगळे निदान आमच्याकडे होते. त्यामुळे हे सगळे करून ९ जुलै ला सुमेध ने जर्मनीतील ऑफिस मध्ये दिले. आणि दहा जुलैला दुपारी १ वाजता तुमचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे असा फोन आला. गेल्या ३.५ महिन्याची प्रतीक्षा अखेर संपली होती. सुमेध ने त्याचे तिकीट रद्द केले आणि माझे तिकीट बुक झाले. अजून व्हिसा stamp करून घेण्यासाठी मुंबईला जायचे होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन परीक्षा होती. आता फक्त जाऊन stamp करायचा व्हिसा, म्हणजे फार वेळ लागणार नाही असे वाटले होते. परंतु मी आता गेले तेव्हा कळले की इतर व्हिसा application साठी आलेले लोक पण इथेच असणार आहेत. त्यामुळे मला ५५ व नंबर मिळाला. पुन्हा ३ तास थांबून अखेर माझा नंबर आला आणि व्हिसा stamp झाला. २७ मार्च पासूनचा प्रत्येक दिवस मला त्या व्हिसावर दिसत होता. इतके दिवस सगळ्यांना फोन करणे टाळले होते. आज मी स्वतःहून सगळ्यांना फोन करत होते. १५ जुलैला जायचे नक्की झाले. आणि हुश्श वाटले एकदाचे. २७ मार्च पासून सुरु झालेले एक महानाट्य संपण्याच्या मार्गावर होते पण एक शेवटचा अंक अजून व्हायचा होता.
विमान तर वेळेवर निघाले. दुबईला थांबून पुढचे निघाले. पण Frankfurt ला जागा नाही म्हणून एक तास आम्ही पार्किंग च्या रांगेत होतो. मग जागा मिळाली ती एका कोपऱ्यात. बस ने आत यायला अजून गेला. पोचले तेव्हा Immigration ला भली मोठी रांग. माझा शेवटचा अगदी खरेच शेवटचा नंबर लागला. सगळ्या कागदपत्रांची फ़ाइल माझ्याकडे होतीच. आता त्या immigration च्या काकानी मला विचारले की invitation लेटर दाखवा. हे एक सोडून सगळे इतर कागदपत्र माझाकडे होते. invitation लेटर शिवाय दिलाय का तुम्ही व्हिसा असे तोंडावर आले होते. बहुधा शेवटची म्हणून आता तो निवांत होता. पण मग त्याला काय वाटले माहित नाही. सरळ मारला शिक्का. या एवढ्या सगळ्या वेळात सुमेध वाट बघत होता आणि माझे झोपेत विमान च चुकले वगैरे की काय असे त्याला वाटत होते कारण सगळे लोक आले तरीही मी दिसत नव्हते. शिक्का मारलेला पासपोर्ट घेऊन मी bags घ्यायला आले तर शेवटच्या दोन bags माझ्याच होत्या. आता हा तरी खरंच शेवटचा अंक असू देत अशी मनोमन प्रार्थना करील शेवटी खऱ्या अर्थाने माझे जर्मनीत आगमन झाले आणि व्हिसा ची ही महान कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

No comments:
Post a Comment