म्युनिक
साल्झबुर्ग - भाग २
साल्झबुर्ग - भाग १
ठरल्याप्रमाणे गार्मिश पार्टेन किर्शेन इथे जाण्यासाठी म्युनिक हून सकाळीच निघालो. इथून पुढे आल्प्स च्या जर्मनीतील सर्वोच्च शिखरावर म्हणजेच Zugspitze इथे जाण्यासाठी ट्रेन घ्यायची होती. रस्त्यावर विशेष रहदारी नव्हती त्यामुळे गाडी जोरात बुंगवणे चालू होते. अगदी गार्मिश च्या जवळ आलो आणि गाड्यांच्या रांगाच रंग पुढे दिसू लागल्या. एवढे लवकर निघूनही आता ट्रेन मिळणार की नाही अशी शंका येऊ लागली. सुदैवाने कासवाच्या गतीने का असेना, पण गाड्या पुढे सरकत होत्या. त्यामुळे अखेर रेल्वे स्टेशन ला पोचलो आणि तिकीट काढून फलाटावर आलो. आम्ही दोघे सोडून इतर सगळी जनता स्की करायला जाणारी होती. सगळ्यांच्या हातात सगळे साहित्य दिसत होते. शंभर दीडशे लोकांमध्ये आम्ही ५-६ जण असे फक्त पर्यटक म्हणून आलो होतो. अगदी लहान लहान बच्चे कंपनी सुद्धा उत्साहाने स्की साठी जात होते. अशा वेळी अगदीच लाज वाटते आपली. केवढे उत्साहाने हे सगळे लोक त्यांचे छंद जोपासतात. असो. हा संपूर्ण परिसर स्की परिसर म्हणून जगप्रसिद्ध आहे. येथील वेगवेगळ्या ५-६ जागांवरून वर जाण्यासाठी रोप वे आहेत. खाली नकाशात दिल्याप्रमाणे गार्मिश हून पहिली ट्रेन ही गार्मिश ते आईबसे या स्थानकापर्यंत जाणारी होती.
आजूबाजूला संपूर्ण स्नो दिसत होता. सगळी कौलारू घरे अजूनच गोड दिसत होती. सकाळी दहा वाजता सुद्धा या सगळ्या इतर स्थानकांवर पार्किंग ला जागा नव्हती इतके लोक स्की करण्यासाठी आले होते. अगदी हळू वेगात आमची ही ट्रेन वळणे घेत घेत, आजूबाजूला सगळीकडे बर्फ़च बर्फ अशी सफर घडवीत, छोट्या डोंगरांमधून पुढे जात होती. आईबसे ला पोचलो आणि बाजूलाच पुढे Zugsspitze कडे जाणारी दुसरी ट्रेन उभी होती. आत बसलो आणि पुढच्या ५ मिनिटात ट्रेन पुढे निघाली.
हा एक अविस्मरणीय अनुभव होता. संपूर्ण डोंगरात चढत जाणारी ही ट्रेन म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना आहे. वरच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कितीतरी किमी अंतर आम्ही बोगद्यात होतो. गाडीचा वेग अगदी कमी असतो. आपण चढण चढतो आहोत हे अनुभवु शकत होतो. बोगद्यातील हा प्रवास पुढे Zugspitze च्या अगदी थोडा आधी संपला आणि पुढे दिसले ते हे.
हजारो लोक इथे स्की करताना दिसत होते. काही अजून नवशिके होते तर काही वर्षानुवर्षे या बर्फात खेळलेले. या सगळ्यांना बघताना सुद्धा खूप छान वाटत होते.
इथून पुन्हा एक रोप वे होता ज्याने आम्ही Zugspitze ला पोचणार होतो. त्यामुळे इथे जास्त वेळ थांबता लगेच रोप वे ने मुख्य शिखरावर पोचलो. इथून पुढचे २ तास वेड्यागत सगळीकडे बघणे, फोटो काढणे हे सुरु होते. थंडी वाजत असूनही आणि प्रचंड वेगात वारे वाहत असूनही इथून हलावे वाटत नव्हते. भरभरून सगळीकडे बघायचे, हे खरंच इतके सुंदर, विलोभनीय निसर्गसौंदर्य आपण अनुभवत आहोत हे खरे वाटावे म्हणून स्वतःलाच चिमटा काढावा असे वाटत होते. चारही बाजूंनी पसरलेले पर्वत, त्यावर पांढराशुभ्र बर्फ आणि यावर सूर्यकिरणांचा वर्षाव. याहून अधिक काय बोलावे. दिसले बर्फाचे डोंगर केला फोटोंचा कहर असे झाले होते. दोन दिवसांपूर्वीच साल्झबुर्ग जवळ उंटर्सबेर्ग ला आणि इतर प्रवासात पण हे बर्फाच्छादित पर्वत दिसत होते तरीही आजचे हे एकमेवाद्वितीय होते.
इथेच या सगळ्यामागचा इतिहास दाखविणारे, इथे हे सगळे तंत्रज्ञान कसे विकसित झाले, कामगारांनी किती कठीण परिस्थितीत काम करून हे पूर्णत्वास नेले, ट्रेकिंग करत कोण कोण इथे चढले वगैरे माहिती देणारे एक प्रदर्शन होते. ते पाहिले. शेवटी जेव्हा पोटोबाने चला म्हणून सिग्नल दिला तेव्हा मग इथेच असणाऱ्या हॉटेल मध्ये बसलो. अजून कित्येक जण स्की करण्यात गुंग होते त्यामुळे अगदी छान जागा मिळाली. २९०० मी उंचीवर आणि सभोवताली फक्त आणि फक्त हिमशिखरे अशा ठिकाणी जेवण. अहाहा. शाकाहारींसाठी एकमेव गरमागरम बटाट्या चे सूप होते आणि ते या थंडीसाठी उपयुक्त ठरले. ते खाउन खास जर्मन पद्धतीच्या काफे आणि कुखेन म्हणजेच कॉफी आणि केक वर ताव मारला.
उठावेसे वाटत नव्हते तरीही पुन्हा एकदा सगळे मन भरून पहिले आणि येताना ट्रेन ऐवजी सरळ आईबसे ला जाणार्या रोप वे ने खाली उतरलो. हा रोप वे प्रवास फारच मोठा होता. जे अंतर ट्रेन ने आलो ते सगळे एकत्र रोप वे अगदीच जलद उतरलो. पुन्हा पुढच्या ट्रेन ने गार्मिश पार्टेन किर्शेन ला पोचलो आणि म्युनिक च्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला. इतके काही सुंदर सगळे या चार दिवसात अनुभवले होते की समाधान व्यक्त करण्यासाठी शब्दच नव्हते. अजून काही फोटो.
म्युनिक ला परतलो आणि शेवटचा आणि परतीचा दिवस उगवला. जाता जाता डाखाऊ या म्युनिक जवळील महायुद्धातील Concentration Camp ला भेट द्यायची म्हणून इथे थांबलो. महायुद्धात ज्यू आणि राजकीय कैदी यांच्यासाठी इथे पहिला या पद्धतीचा कॅम्प बांधण्यात आला. पुढे मग हा कॅम्प इतर ठिकाणच्या कॅम्प साठी मॉडेल म्हणून वापरण्यात आला. १२ वर्षात इथे जवळपास २००००० कैदी कोंडण्यात आले. कित्येकांची
निर्घुण पणे हत्या करण्यात आली, अनन्वित अत्याचार करण्यात आले. खाण्यापिण्याचे हाल, कष्टाची कामे आणि काही चुकले तर होणाऱ्या महाभयानक शिक्षा हे सगळे कल्पनेच्या पलीकडले होते. ही सगळी माहिती चित्ररूपाने वेगवेगळ्या ठिकाणी दाखविण्यात आलेली आहे. जे बघताना आपल्याला इतका त्रास होतो तो या लोकांनी कसा सहन केला असेल? इतिहासातील या काळ्या पर्वाविषयी यापूर्वी काही वाचले असेल, पाहिले असेल तरीही इथे येउन ते सगळे अगदी काल परवा घडल्यासारखे वाटते. अचानक Anne Frank चे संग्रहालय आठवते. अशा परिस्थितीत सुद्धा या कैद्यांपैकी काहींनी कविता रचल्या तर काहींनी चित्रे काढली. या लढवय्या माणसांना शब्दात काय दाद देणार. त्यांच्या कुटुंबियांची झालेली परिस्थिती, माणुसकीला काळीमा फासतील अशा शिक्षांचे स्वरूप हे सगळे वातावरण हेलावून टाकते. युद्ध संपल्यानंतरही इथली स्थिती इतकी वाईट होती की अनेक लोकांचे सुटका झाल्यावरही मरणप्राय हाल होते. या हुतात्मा झालेल्यांसाठी इथे स्मारक बांधण्यात आले आहे. जे काही बोटावर मोजता येण्या इतपत लोक जिवंत राहिले त्यांच्यापैकीच एकाने याचे वास्तू रचनेचे काम केले आहे. अत्याचाराचे वर्णन असले तरीही या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, शांतता रहावी हीच गोष्ट या कॅम्प ची धावती भेट सुद्धा शिकवून जाते. अंगावर शहारा आणणारा हा अनुभव होता. पुन्हा कधीतरी परत येऊ हे मनाशी ठरवून इथून बाहेर पडलो.
६ दिवसांची ही अविस्मरणीय सहल आता अंतिम टप्प्यात येउन पोचली होती. गाडी घराच्या दिशेने निघाली. अजूनही युंही चला चल राही चे सूर गाडीत ऐकू येत होते. कडाक्याची थंडी, ढगांआडून पाठशिवणी चा खेळ खेळणारा सुर्य, निरभ्र आकाश, नाताळ साठी सजलेली शहरे, टुमदार साल्झबुर्ग, संपूर्ण प्रवासात सोबतीला असणाऱ्या आल्प्स पर्वतरांगा, १८० पर्यंत पळविलेला गाडीचा वेग, मिठाच्या खाणी, लहान होऊन केलेली घसरगुंडी ची सफर, बायर्न किंवा बव्हेरिया चे वैभव असे म्युनिक, आणि या सगळ्या आनंदाचा कळस म्हणून Zugspitze, निसर्गाची किमया आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, इतिहासातील काही घटनांनी भावनिक करणारे डाखाऊ चे स्मारक, या आणि अशा कित्येक आठवणी घेऊन घरी परतलो. आयुष्यभर स्मरणात राहील अशी ही सफर. यापूर्वी कित्येक ठिकाणी भटकंती झाली, अजूनही होत राहील परंतु या सम हीच.
साल्झबुर्ग - भाग २
साल्झबुर्ग - भाग १
ठरल्याप्रमाणे गार्मिश पार्टेन किर्शेन इथे जाण्यासाठी म्युनिक हून सकाळीच निघालो. इथून पुढे आल्प्स च्या जर्मनीतील सर्वोच्च शिखरावर म्हणजेच Zugspitze इथे जाण्यासाठी ट्रेन घ्यायची होती. रस्त्यावर विशेष रहदारी नव्हती त्यामुळे गाडी जोरात बुंगवणे चालू होते. अगदी गार्मिश च्या जवळ आलो आणि गाड्यांच्या रांगाच रंग पुढे दिसू लागल्या. एवढे लवकर निघूनही आता ट्रेन मिळणार की नाही अशी शंका येऊ लागली. सुदैवाने कासवाच्या गतीने का असेना, पण गाड्या पुढे सरकत होत्या. त्यामुळे अखेर रेल्वे स्टेशन ला पोचलो आणि तिकीट काढून फलाटावर आलो. आम्ही दोघे सोडून इतर सगळी जनता स्की करायला जाणारी होती. सगळ्यांच्या हातात सगळे साहित्य दिसत होते. शंभर दीडशे लोकांमध्ये आम्ही ५-६ जण असे फक्त पर्यटक म्हणून आलो होतो. अगदी लहान लहान बच्चे कंपनी सुद्धा उत्साहाने स्की साठी जात होते. अशा वेळी अगदीच लाज वाटते आपली. केवढे उत्साहाने हे सगळे लोक त्यांचे छंद जोपासतात. असो. हा संपूर्ण परिसर स्की परिसर म्हणून जगप्रसिद्ध आहे. येथील वेगवेगळ्या ५-६ जागांवरून वर जाण्यासाठी रोप वे आहेत. खाली नकाशात दिल्याप्रमाणे गार्मिश हून पहिली ट्रेन ही गार्मिश ते आईबसे या स्थानकापर्यंत जाणारी होती.
![]() |
| इथे दाखवल्याप्रमाणे सलग ४-५ किमी अशी चढण चढत ही ट्रेन वर जाते. चित्र जालावरून साभार. |
हा एक अविस्मरणीय अनुभव होता. संपूर्ण डोंगरात चढत जाणारी ही ट्रेन म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना आहे. वरच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कितीतरी किमी अंतर आम्ही बोगद्यात होतो. गाडीचा वेग अगदी कमी असतो. आपण चढण चढतो आहोत हे अनुभवु शकत होतो. बोगद्यातील हा प्रवास पुढे Zugspitze च्या अगदी थोडा आधी संपला आणि पुढे दिसले ते हे.
| डोंगरात वर असलले रेल्वे स्टेशन. |
हजारो लोक इथे स्की करताना दिसत होते. काही अजून नवशिके होते तर काही वर्षानुवर्षे या बर्फात खेळलेले. या सगळ्यांना बघताना सुद्धा खूप छान वाटत होते.
इथून पुन्हा एक रोप वे होता ज्याने आम्ही Zugspitze ला पोचणार होतो. त्यामुळे इथे जास्त वेळ थांबता लगेच रोप वे ने मुख्य शिखरावर पोचलो. इथून पुढचे २ तास वेड्यागत सगळीकडे बघणे, फोटो काढणे हे सुरु होते. थंडी वाजत असूनही आणि प्रचंड वेगात वारे वाहत असूनही इथून हलावे वाटत नव्हते. भरभरून सगळीकडे बघायचे, हे खरंच इतके सुंदर, विलोभनीय निसर्गसौंदर्य आपण अनुभवत आहोत हे खरे वाटावे म्हणून स्वतःलाच चिमटा काढावा असे वाटत होते. चारही बाजूंनी पसरलेले पर्वत, त्यावर पांढराशुभ्र बर्फ आणि यावर सूर्यकिरणांचा वर्षाव. याहून अधिक काय बोलावे. दिसले बर्फाचे डोंगर केला फोटोंचा कहर असे झाले होते. दोन दिवसांपूर्वीच साल्झबुर्ग जवळ उंटर्सबेर्ग ला आणि इतर प्रवासात पण हे बर्फाच्छादित पर्वत दिसत होते तरीही आजचे हे एकमेवाद्वितीय होते.
| याच साठी केला होता अट्टाहास (समुद्र सपाटी पासून २९६२ मी) |
| या फोटोत खालून वर येणारी ट्रेन दिसते आहे. अगदी एका बारीक रेषेसारखी. ओळखा पाहू? |
म्युनिक ला परतलो आणि शेवटचा आणि परतीचा दिवस उगवला. जाता जाता डाखाऊ या म्युनिक जवळील महायुद्धातील Concentration Camp ला भेट द्यायची म्हणून इथे थांबलो. महायुद्धात ज्यू आणि राजकीय कैदी यांच्यासाठी इथे पहिला या पद्धतीचा कॅम्प बांधण्यात आला. पुढे मग हा कॅम्प इतर ठिकाणच्या कॅम्प साठी मॉडेल म्हणून वापरण्यात आला. १२ वर्षात इथे जवळपास २००००० कैदी कोंडण्यात आले. कित्येकांची
निर्घुण पणे हत्या करण्यात आली, अनन्वित अत्याचार करण्यात आले. खाण्यापिण्याचे हाल, कष्टाची कामे आणि काही चुकले तर होणाऱ्या महाभयानक शिक्षा हे सगळे कल्पनेच्या पलीकडले होते. ही सगळी माहिती चित्ररूपाने वेगवेगळ्या ठिकाणी दाखविण्यात आलेली आहे. जे बघताना आपल्याला इतका त्रास होतो तो या लोकांनी कसा सहन केला असेल? इतिहासातील या काळ्या पर्वाविषयी यापूर्वी काही वाचले असेल, पाहिले असेल तरीही इथे येउन ते सगळे अगदी काल परवा घडल्यासारखे वाटते. अचानक Anne Frank चे संग्रहालय आठवते. अशा परिस्थितीत सुद्धा या कैद्यांपैकी काहींनी कविता रचल्या तर काहींनी चित्रे काढली. या लढवय्या माणसांना शब्दात काय दाद देणार. त्यांच्या कुटुंबियांची झालेली परिस्थिती, माणुसकीला काळीमा फासतील अशा शिक्षांचे स्वरूप हे सगळे वातावरण हेलावून टाकते. युद्ध संपल्यानंतरही इथली स्थिती इतकी वाईट होती की अनेक लोकांचे सुटका झाल्यावरही मरणप्राय हाल होते. या हुतात्मा झालेल्यांसाठी इथे स्मारक बांधण्यात आले आहे. जे काही बोटावर मोजता येण्या इतपत लोक जिवंत राहिले त्यांच्यापैकीच एकाने याचे वास्तू रचनेचे काम केले आहे. अत्याचाराचे वर्णन असले तरीही या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, शांतता रहावी हीच गोष्ट या कॅम्प ची धावती भेट सुद्धा शिकवून जाते. अंगावर शहारा आणणारा हा अनुभव होता. पुन्हा कधीतरी परत येऊ हे मनाशी ठरवून इथून बाहेर पडलो.
६ दिवसांची ही अविस्मरणीय सहल आता अंतिम टप्प्यात येउन पोचली होती. गाडी घराच्या दिशेने निघाली. अजूनही युंही चला चल राही चे सूर गाडीत ऐकू येत होते. कडाक्याची थंडी, ढगांआडून पाठशिवणी चा खेळ खेळणारा सुर्य, निरभ्र आकाश, नाताळ साठी सजलेली शहरे, टुमदार साल्झबुर्ग, संपूर्ण प्रवासात सोबतीला असणाऱ्या आल्प्स पर्वतरांगा, १८० पर्यंत पळविलेला गाडीचा वेग, मिठाच्या खाणी, लहान होऊन केलेली घसरगुंडी ची सफर, बायर्न किंवा बव्हेरिया चे वैभव असे म्युनिक, आणि या सगळ्या आनंदाचा कळस म्हणून Zugspitze, निसर्गाची किमया आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, इतिहासातील काही घटनांनी भावनिक करणारे डाखाऊ चे स्मारक, या आणि अशा कित्येक आठवणी घेऊन घरी परतलो. आयुष्यभर स्मरणात राहील अशी ही सफर. यापूर्वी कित्येक ठिकाणी भटकंती झाली, अजूनही होत राहील परंतु या सम हीच.

No comments:
Post a Comment