जर्मन वर्मन - २
रोजच्या बोलण्यात तीन आणि कधी कधी चार भाषा येतात, जर्मन आणि मराठी मुख्य, इंग्रजी अधून मधून आणि काही वेळा हिंदी, या सगळ्यात बऱ्याच गमती जमती घडत असतात.
त्यात जर्मन भाषेत जसेच्या तसे उच्चार आणि इंग्रजीत पूर्ण वेगळे. काल सृजनच्या इंग्रजी परीक्षेतला Listen हा शब्द मी जर्मन भाषे प्रमाणे लिस्टेन असा वाचला आणि इथे काय लिस्ट चा संबंध असं डोक्यात आलं तेव्हा हे listen म्हणजे ऐका आहे हे लक्षात आलं. 😂 काहीही काय होतंय हे असं असा प्रश्न पडला.
फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर कुणीतरी दास हे आडनाव आणि पुढे नाव आणि मग प्रोफेशन असं लिहिलं होतं. ते मी das म्हणजे जर्मन मधलं दास असं वाचलं आणि असं पण लिहितात का असा प्रश्न पडला (मधुरा दास ब्लॉगर टाईप 😉)तेव्हाच ओह ते आडनाव आहे हे लक्षात आलं 😂
Die हा इंग्रजीतला शब्द जर्मन मधला दी म्हणून वाचला,उलट म्हणजे जर्मन मधलं die म्हणजे दी हे मी एकदा डाय असं वाचलं होतं.
काही शब्द जे इंग्रजी आणि जर्मन मध्ये सारखेच आहेत पण स्पेलिंग मध्ये बारीक फरक आहे त्या बाबत इंग्रजी स्पेलिंग चुकवणे हे तर सर्रास घडतं, उदाहरण Machine ऐवजी Maschine असं सवयीने लिहिलं जातं.
सुरुवातीला आमच्या जर्मन भाषेवर इंग्रजी प्रभाव असायचा. आता इंग्रजीवर जर्मन कुरघोडी करते, तेव्हा एकाच वेळी जर्मन जास्त अंगवळणी पडल्याचं आश्चर्य वाटतं आणि त्याच वेळी आपल्याला नीट येत असणाऱ्या इंग्रजी भाषेत चुका होतात याचं वाईट वाटतं. या सगळ्या सरमिसळीत रोजचे नवीन किस्से जमा होत जातात..
मधुरा देशपांडे शेंबेकर
१५-१२-२४
अश्या अनेक गोष्टीत भाषांची सरमिसळ होत रोज नवीन किस्से जमा होतात.
योग्य भाषा आणि शब्द यासाठी मी प्रचंड आग्रही असले, तरी रोजच्या घरगुती बोलण्यात तीन भाषांची सरमिसळ होते.
असं हल्ली अनेक वेळा होतं, इंग्रजी भाषेतून संवाद होतच नाहीत, तरी एकदा सुमेध सोबत चर्चेत एक दोन वाक्य इंग्रजी आली तर सृजन ने, आपण मराठी आहोत मराठीत बोल असं मला सुनावलं.
आता der (देर) या शब्दाच्या गमती अजून घडल्या नाहीयेत, त्यासाठी देर आहे.
No comments:
Post a Comment