अमेरिका भेटीबद्दल सविस्तर लेखमालिका लिहिणार आहे,.पण तोपर्यंत काही लहान सहान मुद्दे सुचतील तसे इथे लिहिते आहे. मागच्या दोन पोस्ट नंतर ही त्यातली तिसरी पोस्ट -
पहिल्याच दिवशी सकाळी हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट करायला गेलो तेव्हा बसलेला पहिला धक्का होता, की प्लेट्स, चमचे, ग्लासेस, बाऊल सगळं Single use plastic होतं. प्लेट्स निदान कागदी तरी, पण कटलरी, बाऊल तर पूर्ण प्लास्टिकचे. तिथेच waffle Maker होतं, तिथेही प्लास्टिक पेल्यांची चळत होती, एक प्लास्टिक पेला घेऊन त्यात ते बॅटर घ्यायचं, ते waffle Maker मध्ये ओतायचं, एकीकडे Waffel तयार होतील आणि तो बॅटर ज्यातून घेतलं तो ग्लास फेकायचा 😡 हे असं Waffel Maker युरोप मध्ये कुठेही पाहिलं नव्हतं, असे स्वतःचे Waffel करून घेणे सृजन साठी नवीन अनुभव म्हणून छान होता पण प्रत्येक Waffel साठीचे प्लास्टिक ग्लास मात्र खुपत राहिले.
हे सगळीकडे आहे का माहीत नाही, कदाचित या हॉटेल मध्ये असेल फक्त, म्हणून जरा आशावादी होते. पण आता ३ हॉटेल मध्ये हाच अनुभव आला, तेव्हा हे बरंच कॉमन असावं असं वाटलं. ही सगळी हॉटेल medium price range मधली, स्वतःचे ब्रँड नेम असणारी आणि शहर ते लहान गाव अश्या वेगवेगळ्या ठिकाणची आहेत. प्रत्येक हॉटेल मध्ये रोज साधारण ५० लोक राहत असतील तर रोज असा किती कचरा यातून तयार होत असेल, हा प्रश्न मनात येत राहिला. हेच कटलरी बाबत सुद्धा, रोज प्लास्टिकचे अनेक चमचे बाऊल हेही असेच वापरले जात आहेत.
एक दिवस Hotel मधला ब्रेकफास्ट न घेता वेगळ्या एका कॅफे मध्ये गेलो होतो, तिथे for here असं सांगून सुद्धा सगळं disposable plates मधूनच मिळालं. To go असेल तर प्रश्न नाही, पण तिथेच बसून खायचं असेल तर कॉफी साठी कप, सँडविच साठी प्लेट असेल असं वाटलं होतं. प्रत्येक वेळी हे काही फॅन्सी कटलरी असावी अशी अपेक्षा नाही पण ते कागदी कप सारखे नको वाटतात. यात काही वस्तू recyclables आहेत, पण बहुतांशी पूर्ण प्लास्टिक होतं.
पर्यावरणाची हानी हा विषय आता काही नवीन राहिलेला नाही. प्लास्टिक आपण सगळेच या ना त्या प्रकारे वापरतो, पण वैयक्तिक पातळीवर आम्ही याबाबतीत जागरूक आहोत आणि आपल्याकडून कमीत कमी कचरा व्हावा, शक्य तिथे टाळावं यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे Waffel Maker साठी तिथे एखादा measuring Glas ठेवणे किंवा अजून काही उपाय करता येईल, ही सहज टाळण्यासारखी गोष्ट आहे. आणि Hotel सारख्या ठिकाणी कोणत्याही त्यांच्या मॅनेजमेंट ला यात काहीही वाटत नसेल का असंही वाटलं.
या सगळ्यात पर्यावरण हा मुद्दा तर आहेच, शिवाय एखाद्या लेक जवळ रेस्टॉरंट मध्ये बसलो तर it's also an experience, जो त्या to go कप मधून अजिबात मिळत नाही.
युरोपात आजवर bed and breakfast टाईप हॉटेल, medium range hotel, Family owned घरगुती Hotel ते अगदी High Ränge हॉटेल अशा विविध ठिकाणी अनुभव घेतला आहे आणि ब्रेकफास्ट साठी कुठेही disposable plates आणि इतर तिथे दिसलेले नाही. उलट अतिशय चांगली क्रोकरी वापरली जाते. बेकरीत किंवा साध्या कोणत्याही ठिकाणी गेलो आणि तिथे बसून खाणार असू तर कधीही disposable कप दिसत नाहीत, ते फक्त to go साठीच वापरले जातात.
वैयक्तिक पातळीवर जसे या single use प्लास्टिक बाबत विचार करायला हवा, तो कदाचित अनेक जण करत असतीलही, मी त्याबद्दल सरसकट सांगू शकत नाही. पण अश्या बाबतीत सरकारी पातळीवर सुद्धा प्रयत्न दिसायला हवेत, जे इथे तेवढे नसावेत असा अंदाज या सगळ्यातून वाटला. जागतिक महासत्ता म्हणून कदाचित मला हे अपेक्षित नव्हतं. प्लास्टिक स्ट्रॉ चा वापर सुद्धा जर्मनीत गेल्या दोन वर्षात पूर्ण बंद झाला आहे, रेस्टॉरंट असो किंवा अजून कुठेही, कागदी किंवा Metal/Glass straw दिल्या जातात. Single use plastic पण असं Hotel मध्ये कधीही दिसत नाही. बाहेरही वापर त्यामानाने कमी आहे. याशिवाय जर्मनीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर अत्यंत कमी आहे. कोणत्याही सुपरमार्केट मधून सामान घेताना कागदी/कापडी पिशव्या विकत घ्याव्या लागतात किंवा आम्ही स्वतःच्या दणकट कापडी पिशव्या घेऊन जातो, त्याच वर्षानुवर्ष वापरतो. इथे त्याउलट सगळ्या स्टोअर्स मधे सढळ हस्ते वापर दिसला. याचा अर्थ जर्मनीत सगळं ideal आहे असं नाही, बऱ्याच गोष्टींवर तिथेही अजून जास्त सुधारणा होऊ शकतात, पण प्रयत्न निश्चित जास्त आहेत असं वाटलं.
बाकी अमेरिका वारीत Arizona राज्यातल्या अनेक पर्यटन स्थळांनी भुरळ पाडली आहे. आज Utah मध्ये जाऊन एक तास पुढे गेलो, मग पुन्हा मागेही आलो. हा सगळा भूभाग अत्यंत आवडला आहे. Native American अर्थात Navajo Nation ची सफर अविस्मरणीय होत आहे. स्टोरीज मध्ये सध्या काही फोटो शेअर करते आहे. सविस्तर लेखमालिका लिहायला लवकरच सुरू करेन, तोवर अशा अजून काही पोस्ट येत राहतील, नावडलेली कॉफी, पोर्शन साईज आणि पदार्थांमधला इसेन्स हे काही ट्रेलर :)
मधुरा देशपांडे शेंबेकर
२१-०४-२५
No comments:
Post a Comment