आज Grand canyon बघायला गेलो. आत जाऊन गाडी पार्क करून एकेक स्पॉट बघत होतो. तिथे शेजारीच एक जण उभा होता, जर्मन भाषेत त्याच्या मित्रासोबत बोलत होता. आणि त्याच्या टी शर्ट वर आम्ही राहतो तिथल्या शेजारच्या गावाचं नाव आणि पोस्टल कोड होता. ते बघून नवऱ्याने तुम्ही याच गावात राहता का विचारलं? एक तर आमचे चेहरे भारतीय आणि जर्मनीबाहेर असे अचानक जर्मन बोललो की लोक क्षणभर बुचकळ्यात पडतात. तसंच त्याचं पण झालं, त्यात इथे इतकं लहान गाव माहीत आहे असंही त्याला वाटलं असेल, कारण ते काही Frankfurt किंवा बर्लिन नाही. तोवर सुमेधने त्याला आमच्या गावाचं नाव सांगितलं, आम्ही आधी त्याच्याच गावात राहत होतो हेही त्याला सांगितलं. कुठल्या कुठे असे एका किंवा शेजारच्या गावातले लोक भेटतात याबद्दल बोललो. जर्मन लोक इथे खूप दिसतात, मागच्या चार दिवसात प्रत्येक ठिकाणी जर्मन कानावर पडत होती. पण हे अगदी जवळचं गाव म्हणून योगायोग वाटला. आणि मग बाय, कदाचित पुन्हा भेटू असं म्हणून आम्ही पुढे गेलो.
यावरून आठवलं, दोन वर्षांपूर्वी लंडन मध्ये असताना, lift मध्ये दोन लोक आपापसात जर्मन मध्ये बोलत होते आणि त्यांना हॉटेल संदर्भात काहीतरी प्रश्न होता. ते ऐकून समजलं म्हणून मी उत्तर दिलं आणि ते अचानक भारतीय चेहरा आणि जर्मन बोलणं यामुळे बघतच राहिले. मग पुढे Danke म्हणजे थँक्यू झालं, तोवर आमचा मजला आला आणि tschüss म्हणजेच बाय म्हणून मी पुढे गेले.
आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेत आम्हाला न समजलेलं English आणि न समजलेले उच्चार याचेही अनेक किस्से घडत आहेत. त्या बद्दल वेगळ्या पोस्ट मध्ये...
#अमेरिका
#अमेरिकावारी
#GermanPOV
#IndoGermanPOV
#अमेरिकेचीसफर #अमेरिकेचीसफर२०२५
No comments:
Post a Comment