25 Highs and lows from 2025
Highlights लिहिणार होते पण बदललं, कारण हे वर्षच तसं होतं. गेले दहा बारा दिवस ही पोस्ट लिहिते आहे पण नीट काही उतरवता येत नव्हतं. आज स्वतःला जरा दम देऊन लिहून काढलं. 😊
1. यावर्षी आठवणीत राहतील अशा २ ट्रिप झाल्या. युएस आणि स्वित्झर्लंड. Switzerland नवीन नाही, तिथे अनेक वेळा गेलो आहे पण २०१४ नंतर यावेळची ट्रिप जास्त आवडली. अमेरिका देश म्हणून समजून घेणे नवीन अनुभव होता. त्यातही "नेटिव्ह अमेरिका" म्हणून अजून वेगळा. तिथल्या निसर्गाने अचंबित केलं, स्तब्ध केलं, कित्येक वेळा भारावून गेलो. बाकी Lifestyle wise आपण किती जर्मन पद्धतींना सरावलो आहोत हे नव्याने जाणवलं. 😁
2. यावर्षी जर्मन नागरिकत्व घेतलं. दोन वर्षांपूर्वी पर्यंत मी मानसिक तयार नव्हते, त्यावर वेगळ्या लेखात लिहावं लागेल, पण मागच्या दोन वर्षात त्यावर विविध कारणांनी सांगोपांग विचार करून आणि मानसिक तयारीही झाल्यावर application केलं आणि यावर्षी त्यावर शिक्कामोर्तब झालं. The night before going for final signature was too emotional, but now content about the decision.
3. सृजन दिवसेंदिवस मोठा होत जाताना अनुभवलं. यावर्षी त्याला बरेच महिने त्याच्या आवडत्या स्पोर्ट्स पासून लांब राहावे लागलं. त्याच्या बोटाची दुखापत, अजून काही आजारपण आणि मग माझं हाताचं दुखणं अशा अडचणी येत गेल्या. पण ते वगळता त्याने इतर भरपूर काय काय केलं. जिद्दीने पूर्णपणे स्वतः Rubik's क्यूब solve करायला शिकला, अनेक वेळा प्रयत्न करून ते न जमूनही त्याने चिकाटी दाखवली आणि शेवटी जमवलं हे खूप आवडलं. ❤️ मग त्याने त्यात best timing साठी प्रयत्न करून तेही काही सेकंदांवर आणलं. बाकी शाळा नीट सुरू होती. त्याला नवीन मित्र मिळाले आणि त्यांची मैत्री बघून छान वाटलं. हेल्दी खाण्याबाबत अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे, तरी थोडी प्रगती नक्कीच दिसली. 😜
4. यावर्षी ऑफिसच्या कामानिमित्त आठवडाभर पूर्व जर्मनीची झलक अनुभवली. एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण केला.
5. नोव्हेंबर मध्ये हात fracture होणे हा अचानक आलेला ट्विस्ट होता. काही सेकंदात खूप काही बदललं. फ्रॅक्चर ठीक आहे, ते फार complicated होणे, मोठी सर्जरी, long recovery which will be going on until minimum mid next year, physiotherapy, physical pain तेवढाच मानसिक त्रास, भविष्याची चिंता असं सगळं त्यासोबत आलं. हा आघात फार काही शिकवणारा होता, थकवणारा होता. २५ वर्षांपूर्वी झालेल्या तश्याच अपघाताच्या आठवणी, जखमा पुन्हा उघडल्या गेल्या. 😢
6. अर्थात याच दरम्यान अनेक लोक भेटले and many kept their memories forever. वेटींग रूम मधले लोक, दवाखान्यात रूम मध्ये असणारे पेशंट, तिथले अनेक मदतनीस आणि मुख्य माझे सगळे डॉक्टर या सगळ्यांची मी प्रचंड आभारी आहे. एका ऑपरेशन मागे किती जणांचे हात असतात आणि त्यांचं काम किती महत्त्वाचं आहे हे अशा वेळी फार जाणवतं. आणि तेवढीच मेडिकल टेक्नॉलॉजी सुद्धा.
7. हाताच्या दुखण्यामुळे अनेक मित्रमंडळी मदतीला धावून आली. सहज म्हणून डबाभर पोळ्या करून देणारी मैत्रीण, चार ठिकाणाहून आलेले वेगवेगळे डबे, घरी येऊन शेव पुरी चिवडा खाऊ घालणाऱ्या मैत्रिणी, तू म्हणालीस तर येऊ लगेच असं परदेशातून सांगणारी मंडळी, तू यातून बाहेर पडशील असा आधार देणारे अनेक जण सोबत होते. ❤️
8. आई आणि बाबा दोघंही नेहमीप्रमाणे आधार द्यायला होते. त्यांनी माझा प्रत्येक लेख वाचला, कौतुक केलं, इथे दोन महिने होते तेव्हा मला पूर्ण आराम मिळेल हे बघितलं, माझी प्रत्येक achievement सेलिब्रेट केली आणि माझ्या दुःखात खंबीर राहून आधार दिला. ❤️ हे सगळं झाल्यावर चार दिवसात आई इथे येऊ शकली यासाठी कायम grateful आहे.
9. मागची १५-१७ वर्ष ज्याच्या सोबतीशिवाय अपूर्ण आहेत तो सुमेध, मागचे दोन महिने मला अजूनच घट्ट धरून उभा राहिला. मागची तीन वर्ष ऑफिसच्या कामामुळे तो फिरतीवर असायचा, हे काही महिने योगायोगाने इथे होता and he made sure to make it up fullest. त्याआधी खरंतर त्याच्याही आणि पर्यायाने आमच्याही आयुष्यात एक मोठा setback होता, तोही खूप मेहनतीने निभावून आम्ही त्यातून बाहेर येत होतो तर हे झालं. एरवीही प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, पण हे वर्ष खूप परीक्षा घेणारं होतं. And through thick and thin हे यावर्षी अजून जास्त जवळून अनुभवलं. We will stand tall असं एकमेकांना सांगत होतो and we can look back at this beautiful journey of togetherness with a lot more love and respect. ❤️
10. आणि एक शाबासकी स्वतःला, हे सगळं कितीही तरी मी बहुतांशी positive आणि optimistic होते. भीती होती पण त्यापेक्षा जास्त विश्वास होता. मी याआधीही हे एकदा निभावलं आहे, आताही निभावेन ही भावना मनात होती. ऑपरेशन नंतर दोन दिवसात जमेल ते सगळं एकटीने करण्याचा प्रयत्न केला, घरकामात हातभार, स्वतःचं जमेल तेवढं स्वतः आवरणे, लिखाण व्हिडिओ यात स्वतःला बिझी ठेवणे अशा अनेक प्रकारे I still kept smiling more through all the pain and I was so proud of myself. ❤️ खूप तडजोडी कराव्या लागत होत्या आणि अजूनही बरेच दिवस लागतील, पण जमेल.
11. लिखाणाबाबत वयम् या मासिकात लेख प्रसिद्ध झाला. भरपूर लिखाण झालं. नेमके लेख मोजले नाही पण लहान मोठ्या बऱ्याच पोस्ट, प्रवासवर्णन म्हणून अमेरिका सिरीज असं बरंच झालं. तरी अनेक लेख अपूर्ण राहिले. आणि काही जे प्लॅन होते त्यावर सुरुवात झाली, पण ते पूर्ण बारगळले. 😢 यावर्षी काही लेख दहा वर्षात पहिल्यांदाच ५०००० पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचले. बरेच फॉलोअर्स वाढले. आणि त्याने जरा हुरूप आला. 😊 काहींचे खूप छान मेसेज आले, ते फोटोत आहेत 💜
12. Gemüse Gewürze या माझ्या जर्मन पेजवर बरीच activity वाढली. मागचे दोन अडीच वर्ष केलेल्या मेहनतीवर फळं लागतील अशी चिन्ह दिसायला लागली, लोकांनी सुपरमार्केट मध्ये ओळखणे, कौतुकाचे प्रतिसाद येणे याला सुरुवात झाली आणि हात अडकून बसला. 😭 एका व्हिडीओचे 100000 Views झाले. ज्या पोळ्या करायला मी खूप उशीरा शिकले पण उत्तम करायला लागले, त्याच पोळ्यांचा व्हिडिओ जर्मन भाषेतून करताना तो व्हायरल झाला. 😂 And the next week I was in hospital. That timing felt so unfair. काय दृष्ट लागावी उगाच हे विचार मनात येऊन गेले. पण मग त्यावर उपाय म्हणून मी वेगळे व्हिडिओ बनवले and the page got more and more following.
13. जर्मन व्हिडिओ केले तेव्हा अनेकांना आम्ही भाषा बोलतो म्हणजे नेमकं काय हे समजलं आणि बऱ्याच जणांचे aww अशी प्रतिक्रिया आली. मी कितीही लेखात लिहिलं की आम्ही ही भाषा बोलतो, तरी त्याचा impact video मधून दिसला. यातून कौतुक झालं. भाषा समजली नाही तरी तू हे करतेस तर लाइक करू हे प्रेमाने म्हणणाऱ्या मैत्रिणी, हितचिंतक हे दूर राहूनही सपोर्ट करत होते. अनेक जण या प्रवासात कौतुक करत होते and I am thankful to have those people in my life. 😍जर्मन टीचर्स कडून कौतुक झालं 😊
14. आणि तरीही मी हे करते, ही माझी वेबसाईट हे दोन वर्षांपासून सांगूनही "अरे हे माहिती नव्हतं तू असं काही करते" हे असे लोक म्हणाले तेव्हा I was speechless. अजूनही स्टेटस पासून सगळीकडे लिंक देऊन त्या बघून सुद्धा, त्यानंतर कितीही वेळा भेटून अनुल्लेख हे शस्त्र वापरलं जातं, तेव्हा no response is a response हे वाक्य खोलवर जाणवतं. मी फक्त माझ्या आनंदासाठी, भारतीय खाद्यसंस्कृतीचा प्रसार व्हावा म्हणून करत असलेली ही गोष्ट कुणाला का खटकावी हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
15. शिवाय यावर भारतीयांनी कश्याला तुझे व्हिडिओ बघावे असाही प्रश्न मला विचारला गेला होता. या लोकांनी इतके वर्षात कधीही माझे मराठीही लेख वाचून एकही प्रतिसाद दिलेला नाही, ते असेल तर मी समजू शकते, पण इथे मात्र असे प्रतिप्रश्न आले. माझी अपेक्षा फक्त spread the word एवढीच होती. To my sweet surprise, I have now so many Indian followers who are looking at me for learning language. मी भाषा शिकवत नाही पण माझे व्हिडिओ बघून अनेकाना हे जमेल असं वाटलं, अनेक मेसेजेस आले आणि अप्रत्यक्ष पणे माझे व्हिडिओ उपयोगी ठरत आहेत हे खूप समाधान देणारे होतं.
16. लेख न वाचणारे काही व्हिडिओ बघत होते, हे छान असलं तरी मराठी वाचक कमी होत आहेत असंही वाटलं. Stories बघणारे हजारो असतात आणि पोस्ट वर कुणीच नाही हे समीकरण समजत नाही. तरी यावर्षी जरा Hashtag वापरायला शिकले. नवीन पेज सुरू केलं खरं आणि इथेच मुख्य प्रोफाईल वर जास्त लिहित गेले. 😏
17. लिखाणावर बंधन आलं, एका हाताने टायपिंग अवघड जायला लागलं, व्हॉईस to text वापरूनही पूर्ण जमेना, तेव्हा मग व्हिडीओचा प्रयत्न केला. त्यासाठी व्हिडिओ, reel बनवणे, एडिट करणे हे हळूहळू शिकते आहे. अजूनही हात आणि मेंदू यांना लिखाणाचीच ओढ आहे, पण बदल म्हणून, स्वतःला चॅलेंज म्हणून आणि बोकाळलेल्या त्याच त्याच ट्रेंड पेक्षा वेगळा कन्टेन्ट असेल असे व्हिडिओ करत राहणार आहे. ट्रोलिंग सुद्धा झालं ते काय रागातून झालं माहीत नाही.
18. आपण मनापासून ज्यांचं कौतुक केलं, त्यांच्याकडून एकही शब्दाने प्रतिसाद येऊ नये हे पुन्हा एकदा पाहिलं. I like relationships where there is reciprocation. त्यात खोटं कौतुक नको, मी तुला छान म्हणते तू म्हण असं नको. पण संवाद एकतर्फी असेल तर त्रास होतो. एकदाही एखाद्याही पोस्टवर react न होणारे लोक कामासाठी संपर्क साधतात आणि पुन्हा आपल्याला बाजूला करतात असे अनुभव शहाणपण शिकवणारे होते.
19. यावरून, लवकरच चाळीशी येणार हे विचार या वर्षी जास्त येत गेले. त्यानिमित्ताने Lifestyle बदल अजून करायला हवेत, फिटनेस आहार याकडे अजून लक्ष द्यायला हवं हे जाणवलं, पण त्यावर खूप काम झालं नाही. हे आता नवीन वर्षाच्या यादीत अग्रस्थानी येईल.
20. त्याचसोबत आयुष्यात कश्याला, कुणाला किती महत्व द्यायचं हेही चाळीशी जवळ येताना जाणवायला लागलं. जिथे त्रास होतो तिथे शक्य त्या boundary ठेवणे हे स्वतःला बजावत राहिले (जरी हे काही वेळा शक्य होत नाही) अजून स्पष्टवक्तेपण personal professional दोन्हीकडे जमवायला हवं असं वाटलं.
21. या वर्षी घरात नवीन फोटो फ्रेम आल्या. गार्डन मध्ये सुमेधने भरपूर काम केलं. बेडरूम मध्ये फर्निचरचे बदल केले, प्लॅनिंग खरेदी आणि सगळं mounting आम्ही घरी केलं, दोन आठवडे त्यात पूर्ण बिझी होतो पण फायनल Outcome was satisfying. दोन तीन वर्षांपासून डोक्यात असलेल्या एक दोन नवीन वस्तुंची खरेदी झाली.
22. पाहुणे - मला खरंतर लोक आवडतात, इथे आल्यापासून घर अनेक जणांनी भरलेलं असणं हे मी मनापासून एन्जॉय केलं आहे. पण हे वर्ष संपताना ते सगळं जरा यावर्षी सगळं जास्त झालं हे जाणवलं. भेटीगाठी छान आहेत पण मुक्कामी असे पाहुणे अनेक महिने होते. We were whole heartedly happy to host many of them but it was a bit draining at the end.
23. यावर्षी सुरुवातीला जमवलेला कमी स्क्रीन टाईम गेल्या दोन महिन्यात पुन्हा अनिर्बंध वाढला. त्याचे तोटे माहिती आहेत, पण तरी हाताच्या दुखण्यादरम्यान तो वाढलाच. त्यातून हल्लीचे ट्रेंड, उथळपणा, थिल्लरपणा, चुकीची माहिती आत्मविश्वासाने सांगणे हे सगळं फार फार खटकलं. तरीही सोशल मिडिया चांगल्या प्रकारे वापरला जाऊ शकतो यावर विश्वास आहे, I will always try to use it for a purpose हे स्वतःला बजावलं.
24. यावर्षी चक्क थिएटर मध्ये जाऊन एक सृजन सोबत Animation आणि एक धुरंधर असे दोन सिनेमे बघितले. अनेक उत्तम मुलाखती, चर्चा ऐकल्या.
25. अनेकांना आठवणीने वर्षअखेरीस थँक्यू मेसेज केले, काहींना अजून करायचे आहेत ते आज उद्यात करेन. I feel acknowledging love is important. त्यामुळे मला आलेल्या प्रत्येक मेसेजला उत्तर दिलं. अर्थात तरीही बरंच काही बोलायचं राहून गेलं.
पुढच्यावर्षी अजून भरपूर काही करायचं आहे, त्याबद्दल बोलत राहूच..
तर सगळे वाचक, प्रतिसादक, followers - Thank you for being a part of my life here through my writing, it means a lot and hope this support continues and grows in coming year.
Wishing all of you a very happy new year!!
It was not possible to put everything in to photos, so here are some compliments to end the year on a positive note just as a symbolic representation 😊
मधुरा देशपांडे शेंबेकर
३१-१२-२०२५
No comments:
Post a Comment