रोजच्याप्रमाणेच आजसुद्धा ऑफिसमध्ये आल्याबरोबर facebook उघडले. ही आता रोजची सवय झालीये. न चुकता हे केलंच जातं. त्यावर रोज कुणाचातरी वाढदिवस म्हणून नोट किंवा reminder आलेले असते. लगेच क्षणाचाही विलंब न करता एका माउस क्लिक मध्ये 'Happy B'day' लिहिले आणि विषय संपला. त्यावर थोड्याच वेळात समोरील व्यक्तीकडून तुमची post like करणे आणि लागलीच Thanks म्हणणारी comment हे ओघाने आलेच. या सर्व गोष्टी इतक्या आपसूक घडतात की अगदी दुसऱ्या क्षणी सुद्धा आपण हे विसरू शकतो की या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे.
हे आठवले आणि खरच मनात आला की आता फक्त एका क्षणात शुभेच्छा देता येत असल्या तरी त्यातले भाव तेच आहेत का? पूर्वी कुठल्याही साधनाशिवाय हे सगळे लक्षात ठेवले जायचे. फक्त मनातल्या मनात किंवा फार तर फार एखादी डायरी! पण त्यात एक वेगळीच मजा होती. कधीतरी एखादया मित्र मैत्रिणीचा किंवा भाऊ -बहिणीचा वाढदिवस विसरल्यावर खाल्लेल्या शिव्या, कधी त्या ऐकण्याच्या आतच विसरलो हे आठवलं की होणारी हुरहूर, आई बाबा किंवा घरातल्या अगदी जवळच्या कुणाचातरी वाढदिवस विसरलोच तर किती बावळट आणि मंद आहे मी असं म्हणत स्वतःलाच वाटलेला पश्चाताप हे सगळं खूप खरं होतं. त्यात कुठेही तांत्रिकपणा नव्हता. आणि मग शुभेछांचा फोन संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ हे सगळं मनात घोळत राहायचं. याआधी सोबत साजरे केलेले सगळे वाढदिवस नकळत डोळ्यांसमोरून जायचे आणि त्या आठवणीत अख्खा दिवस जायचा. अगदी स्वतःच्या वाढदिवशी सुद्धा मनात कुठेतरी 'बघुयातच कुणाकुणाच्या लक्षात राहतो?' हे विचार असायचेच. कधीतरी त्या वाढदिवसाशी आपली एखादी आठवण निगडीत असायची. आजोबांच्या वाढदिवसालाच लागलेला दहावीचा निकाल, होस्टेलवर आधीपासून तयारी केलेला एखाद्या मैत्रिणीचा surprise birth day हे सगळं आता आठवताना सुद्धा किती छान वाटतंय.
आता हे पुर्णपणे विसरलोच आहोत असं नाही.अजूनही बरेचदा काही व्यक्तींचे वाढदिवस आपण लक्षात ठेवतोच, कुठल्याही reminder शिवाय. पण खरच शुभेच्छा देण्यासाठी आपण किती वेळ काढतो? क्षणात शुभेच्छा दिल्या की झालं, त्यापलीकडे त्याचा आनंद मिळवण्यासाठी वेळ काढलाच जात नाहीये.खरंच का आपण असे तांत्रिक पणे वागतो ?
योगायोगाने हे सगळं लिहित असतानाच ऑफिस मधल्या एका सहकाऱ्याचा वाढदिवसा निमित्त केक खायला येण्याचा मेल मिळाला. तेव्हा स्वतःशी एक संकल्प करून आता केक खायला जाते :) नव्हे, शुभेच्छा द्यायला जाते. आणि हेच आतापासून सगळीकडे लागू करते. केवळ reminder येतंय मग शुभेच्छा द्यायला हव्यात या भावनेपेक्षा थोडा वेळ काढूयात आणि मनापासून म्हणूयात 'हैप्पी बर्थ डे'.
very simple :) and so touching, truly technology is ruling us, we should not allow it be our master :)
ReplyDeleteलहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास गं. मजा आली वाचून अगदी अनेक प्रसंग तरळून गेले डोळ्यासमोरून. छान लिहितेस. लिहित राहा, कंटाळा करू नकोस. थांबू नकोस. :)
ReplyDeleteThanks...nakki praatna karel...
ReplyDelete