गाडी सिग्नलला थांबते, हो थांबते सुद्धा कधी कधी. चार दिशांनी दहा लोक हातात भारताचे झेंडे घेऊन येतात, कडेवर पोर रडत असतं..हे लोक प्रत्येक गाडी पाशी जाऊन झेंडे घ्या म्हणतात, मुक्यानेच किंवा मोजक्या दोन शब्दात.. वाईट वाटतं..त्रास होतो..तरी मनात यातलं काय खरं काय खोटं माहीत नाही हेही विचार येतातच..हे असं पुढच्या प्रत्येक सिग्नल पाशी होणार असतं..आपण या सगळ्या विचारात, खिडकी आतून फक्त बघत असतो..हॉर्न जोरजोरात वाजत असतात, सिग्नल हिरवा होतो, किंवा होणार असतो त्या आधीच गाडी पुढे निघते..
पंधरा ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन उद्यावर येऊन ठेपला आहे..
उद्या सकाळ पासून मेसेजेसना उत येईल...थोडी स्वच्छता केली जाईल.. भाषणं होतील..सकाळी लागलेली गाणी ऐकून nostalgic वाटेल..तिरंगी कपडे, फुगे, दागिने, खाद्य पदार्थ सगळे दिसायला लागतील..
पण चिरायू होवो म्हणताना आणि लेहरा दो म्हणताना खूप जास्त प्रश्न पडतील..त्या सिग्नल वरचे ते लोक आठवतील..तिथे अजूनही पंधरा गोष्टी दिसत असतात..आजूबाजूला झोपडपट्ट्या असतात, वर्षानुवर्ष त्या तश्याच आहेत..पुनर्वसन हा शब्द कागदावरच आहे...रस्त्यात थुंकणे हे किती चुकीचे आहे यावर वर्षानुवर्ष बोललं गेलं आहे पण आजही रस्त्यात पचकन थुंकले नाही असा एक रिक्षा वाला भेटला नाही. उबर ओला नसेल तर पैश्यांच्या अवास्तव मागणी वर अडून बसलेले पण तसेच आहेत..सांडपाणी, दुर्गंधी तसेच आहेत..गेल्या दहा दिवसात सरळ सलग चांगला खड्डे विरहीत रस्ता दिसलेला नाही...उत्तम म्हणत नाहीये मी..फक्त बेसिक रस्ता म्हणता यावे असे रस्ते अगदीच मोजके आहेत..कचरा पडलेला नाही असेही रस्ते नाहीत..परवा त्यात तिरंगे दिसतील...याकडे पण दुर्लक्ष करावं लागतं..सगळ्याकडेच खरंतर..पण खुपत राहतं खूप काही...बाकी लीहिण्या सारखं खूप काही आहे..पण नंतर कधीतरी...
No comments:
Post a Comment