सध्या फेसबुक साठी टायमर लावून स्क्रीन टाइम कमी केला आहे, बरीच धावपळ सुरू आहे त्यात लिहायला तेवढी सवड मिळत नाहीये आणि जरा रायटर्स ब्लॉक पण असावा असं वाटतंय, त्यामुळे इथे काहीच लिहिलं जात नाही. पण हा सृजन चा लेख त्याने लिही असा आग्रह केला म्हणून आज फायनली हे जमवलं.
तर मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात, सृजनच्या बोटाला लागलं होतं याबद्दल मी एक पोस्ट लिहिली होती. ती मी काही वेळा झोपताना त्याला वाचून दाखवली आणि त्या गोष्टीचा हिरो तो स्वतः असल्यामुळे, त्याला ती खूप आवडली. असे अजून काही लेख त्याला झोपताना वाचून दाखवले की त्याला आवडतं. तर मधूनच आठवण आली की तो मला ही गोष्ट वाचून दाखव असं सांगायचा. तेव्हा ही गोष्ट रिपीट टेलिकास्ट होणार आहे हे काही डोक्यात नव्हतं. तर जानेवारीत बास्केटबॉल टुर्नामेंट होती तिकडे आम्ही गेलो होतो. खेळ सुरू झाला, सृजन छान खेळत होता. दोन मॅचेस झाल्या, तिसरी मॅच सुरू असताना पुन्हा एकदा त्याच बोटाला लागलं, हे असं थोडं फार होतच राहतं आणि ते विसरून पुन्हा तो खेळतो, पण तो खूप रडायला लागला तेव्हा जास्त लागलं आहे हे लक्षात आलं, आम्ही लगेच तिकडे गेलो, आमच्या कडे एक स्प्रे होता, त्याच्या ट्रेनर कडे एक पट्टी होती ती तिने लावून दिली पण त्याला दुखतच होतं. तरीही जरा बरं वाटत नाही तर पुन्हा सृजन जॉइन झाला, आणि त्याने त्याच हाताने दोन बास्केट पण केले, शेवटची मॅच शेवट पर्यंत खेळला आणि मग आम्ही घरी आलो.
आता ही अर्धीच गोष्ट झाली, पण आईने लेख लिहिला होता तसा आपण पण लिहावा असं नंतर त्याच्या डोक्यात आलं. तू जर्मन मधून लिही, मी मराठीत भाषांतर करेन असं मी म्हणाले, पण त्याला इंग्रजीतून लिहायचं होतं. अजून इंग्रजी भाषेशी त्याची खूप ओळख नाही, समजतं सगळं, बोलू शकतो पण शाळेत इंग्रजी हा विषय या वर्षी पहिल्यांदा आला आहे, पण जमेल तसं माझा फोन घेऊन त्यातल्या नोट्स मध्ये त्याने सगळं टाइप केलं. त्याने लिहिलेलं मी थोडं दुरुस्त केलं, पण पूर्ण गाभा आणि वाक्यं त्याचीच आहेत, हे आता कर ना पोस्ट असं त्याने मला सांगून झालं, परवा तर या विकेंडची डेडलाइन दिली अगदी, मग मीही त्याला जागून आज हे लिहिलं आणि आता बघा तो काय सांगतोय -
The almost broken finger - Part 2
On the 19.01.2025 a Kid called Srujan injured his finger in a basketball 🏀 tournament. After Srujan got home his dad and his mom thaught it might be ok after some rest, so let's wait for a couple of hours. But his mom and dad were wrong 🙅 (हे सगळ्यात महत्त्वाचं 😂) after 6 hours the finger was burning like crazy. So we went to the emergency hospital. It took about 48min for the doctor to arrive, because there was a serious emergencie. But finally he was here. We talked for a little bit, and then he said let's do X-ray. Then he said: It's not broken but put this tape on. If it's still hurting after 4 days go to the surgeon. 4 day's later it was still hurting, so I said to my mom:let's go to the surgeon.But my mom said, let's not go to the surgeon let's go to another doctor. (सर्जन कडेच पण आधी एका orthopedic सेंटर मधून मग तिथे पुढे सर्जन अशी साधारण सिस्टीम म्हणून, पण आई वाक्यं प्रमाणं हे बरोब्बर अश्या वेळी आठवतं, बाकी काही वेळा सोयीस्कर आईची वाक्य विसरली जातात 😆) But then in next days, around day 6 it was healed.
The end.
अशी ही त्याची गोष्ट, बरं झाल्यावर पुन्हा बास्केटबॉल आणि क्रिकेट खेळणं सुरू झालं आहे. आता या अशा बोटाला लागण्याची गोष्ट पुन्हा एकदा घडू नये एवढीच मी प्रार्थना करत आहे. 😊
No comments:
Post a Comment