जर्मनीतल्या Autobahn म्हणजेच हायवेवर, जिथे गाडी सुसाट वेगाने चालवता येते (नियम पाळून पण no speed limit zone मध्ये), तिथे स्पीड व्यतिरिक्त इतरही काही गोष्टी आहेत वाखाणण्या सारख्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ठिकठिकाणी ब्रेक घेण्यासाठी असणाऱ्या जागा. Raststätte/Rasthof हा त्यासाठी वापरला जाणारा शब्द आणि त्याबद्दलची ही पोस्ट.
सहसा आत गेल्यानंतर पहिले पेट्रोल पंप असतो. तिथे बेसिक खायला आणि कॉफी इत्यादी मिळतं. तिथेच पुढे जाऊन अजून काही खाण्याच्या जागा असतात. त्यात McDonald's, Burger King अशा स्टँडर्ड chain असतात. बाहेर मुलांसाठी खेळण्याची जागा असते, तिथे घसरगुंडी, झोके असतात. पैसे देऊन असले तरी अतिशय स्वच्छ टॉयलेट असतात. याशिवाय गाड्या पार्क करतात तिथेच अजून बसायला बाक असतात. ( मागचा एक व्हिडिओ मी अश्याच एका ठिकाणी केला होता 😊) सोबत घेऊन आलेले डबे इथे बसून खाता येतात. शेजारीच कचरापेट्या पण असतात. याच सगळ्या ठिकाणी ट्रक वाल्यांसाठी पण राखीव पार्किंगच्या जागा असतात.
आत खाण्यासोबत बऱ्याच काही वस्तू विकायला असतात. पुस्तकं, त्या त्या भागातली Souvenir, soft Toys अश्या काही random वस्तू दिसतात. प्रवासात पुस्तक वाचायला घ्यायचं म्हटलं, तरी इथे जास्त किंमत देऊन घेण्यापेक्षा एक तर आधी आठवणीने घेऊन जाणे कुणीही prefer करेल असं वाटतं. प्रत्येक वेळी या वस्तू खरंच विकल्या जातील का असा प्रश्न पडतो. 🤔
काही ठिकाणी फक्त पार्किंग आणि टॉयलेट एवढीच सोय असते. पेट्रोल, खाणे या सोयी नसल्या तरीही ब्रेक घेऊ शकू म्हणून. तिथेही बाहेर बसायची सोय असते. इथे स्वच्छतागृह फुकट असतात. त्यामुळे एक दोन वेळा तेवढी स्वच्छता नव्हती, पण इतर वेळी नीट अनुभव होता. फक्त इथे स्टीलच्या टॉयलेट सीट असतात, ज्या हिवाळ्यात त्रासदायक होतात आणि नको वाटतात 😜 त्यापेक्षा पैसे देऊन दुसरीकडे जाऊ असं वाटतं.
गाडीने प्रवास करताना दर काही तासांनी ब्रेक हा गरजेचा असतो. पण अश्या जागांमुळे ती नुसती सोय राहत नाही, तर प्रवासाचा एक भाग म्हणून ब्रेक enjoy करता येतो. कधी तिथून दिसलेला आजुबाजूचा नजारा, कॉफी, तिथे बाहेर बसून खाल्लेला डबा, कधी गर्दीमुळे पार्किंग न मिळणे अश्या सगळ्या प्रकारच्या आठवणी जमा होतात. काल अश्याच एका ठिकाणी थांबलो असताना काढलेले काही फोटो..
याशिवाय Autobahn वरच्या Rettungsweg म्हणजेच emergency सर्व्हिस साठी मोकळी केली जाणारी जागा याबद्दल कधीतरी नंतरच्या पोस्ट मध्ये..
मधुरा देशपांडे शेंबेकर
०३-०५-२०२६

No comments:
Post a Comment