सृजनच्या पाठ्य पुस्तकातून हल्ली जर्मन भाषेतल्या एकेक कविता समजतात. मागच्या वर्षी त्यांना शरद ऋतूबद्दल एक कविता होती, ती बरोबर त्याच वेळी शिकवली गेली. त्याच्या सोबत पहिल्यांदा वाचली तेव्हा पासूनच मला खूप आवडली होती. आज फेसबुक वर २०२३ मधल्या काही फोटोंची मेमरी दिसली आणि पुन्हा ती कविता आठवली.
हातात शिडी घेऊन शरद ऋतू आला
प्रत्येक पानावर बारकाईने ब्रश फिरवत
एकेक झाड आनंदाने रंगवायला लागला
ख्रिसमस ट्री नावाचा मित्र मात्र जरा हिरमुसला
तू या सगळ्यांना रंगवतोस पण मला नाही
असं रे का करतोस म्हणाला..
रंगारी पानं रंगवत राहिला
झाडांसोबत खेळायला वारा आला
आणि रंगीत पानांना सोबत खाली घेऊन आला
अश्या अर्थाची ती कविता..
मराठीत त्याचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न
मूळ कविता - Herbst steht auf dem Leiter
Peter Hacks
मधुरा देशपांडे शेंबेकर
No comments:
Post a Comment